Sunday, 5 July 2015

रेल्वे

[05/07 6:53 PM] asif: ताशी ६०km वेगाने जाणारीरेल्वे ताशी ७५km वेगाने गेली तर निर्धारीत जागेवर १तास अगोदर पोहचते,तर अंतर किती?
सुरु.वेगxनंतरचावेग/नंतरचावेग—सुरु.वेगxअगोदर पोहचलेल मिनिट/६०
=६०x७५/७५-६०x६०/६०
=६०x७५/१५
=३००km
[05/07 6:53 PM] asif: अंतर=गाडीची लांबी+पूल

३००मी.लांबीची गाडी ताशी ५४कीमि वेगाने जाते तर ती गाडी एका खांबास कीती वेळात ओलांडेल?
अंतर=वेळxवेगx५/१८
३००x१८/५x५४
=२०सेकंद
[05/07 6:53 PM] asif: रेल्वे
km/hr चे रुपातंर m/sec मध्ये करताना km/hr ला ५/१८ ने गुणने.
m/sec चे km/hr ला १८/५ ने गुणने.
१.१२सेंकदात एक गाडी १५०मी.जाते ताशी=?
१५०=१२xवेगx५/१८
१५०x१८/५x१२=वेग
४५km/hr.

अंतर=वेळxवेगx५/१८
[05/07 6:53 PM] asif: ७२kmताशी वेगाने धावणारी २००मीटरची आगगाडी१८सेकंदास पुलास ओलांडते तर पुलाची लांबी किती?
७२०००मी.—>३६००सेकंद
अ             —>१८ सेकंद
अ=१८x७२०००/३६००
=३६०
पुलाची लांबी=३६०-२००
                  =१६०मीटर
[05/07 6:53 PM] asif: एक नावाडी त्याची नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेने दोन तासात १८km वल्हवितो तर तो ती नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दोन तासात १०km चालवतो तर प्रवाहाचा ताशी वेग किती?
प्र.ता.वेग=प्र.दिशेने ता.वेग—प्र.विरुद्ध दिशेने ता.वेग/२
=९—५/२
=२km
[05/07 6:53 PM] asif: २४km ताशी वेगाने १०८मी.लांबीची आगगाडी २१km ताशी वेगाने ११७ मी लांबीची आगगाडी समांतर रुळावरुन एकाच दिशेने जात आहे तर त्या परस्परांना किती वेळात भेटतील?
—>एका तासाला ३kmचा फरक आहे.
पहिली गाडी ३६००सेकंदात—२४०००मी.
दुसरी गाडी ३६०० सेकंदात—२१०००मी
३६००सेकंदात=३०००मी
=१०८+११७
=२२५मी.
३६००—>३०००
अ      —>२२५मी
अ=३६००x२२५/३०००
=२७०सेकंद
[05/07 6:53 PM] asif: लातूरहून मुबंईला जाणार्‍या दोन गाड्या अनुक्रमे ७.०० व८.०० वा.सुटल्या.त्यांचा तासी वेग अनुक्रमे६०km व९०kmआहे.तर त्या गाड्या एकमेकीना कधी भेटतील?
दुसर्‍या गाडीस भेटण्यास लागणारा वेळ=वेळेतील फरक xपहिल्या गाडीचा वेग/दोन्ही गाड्यांच्या वेगातील फरक
=१x६०/९०—६०
=६०/३०
=२तास
८+२=१०.००वाजता
[05/07 6:53 PM] asif: वेळ- घड्याळ
घड्याळाची तबकडी नेहमी वर्तुळाकार असते व आतील काटे नेहमी वर्तुळाकार फिरत असते.
१मिनिट=६॰
तास काटा एका मिनिटाला(१/२)॰पुढे सरकतो.
कोन काढणे.
३.३० वाजता किती अंशाचा कोन होईल?
३०x२=६०॰+१५॰=७५॰
🕟४.३७मिनिटास=?
विचारलेला कोन=३०H-११/२M
       =३०x४-११/२x३७
       =१२०-११x३७/२
       =१२०-२०३.५
        =८३.५
[05/07 6:53 PM] asif: आरशातून पाहिल्यास ५वाजून १०मिनिटे हि वेळ दर्शविते तर त्या घड्याळ्यात प्रत्यक्ष किती वेळ दर्शविते.
सूत्र.....दिलेली वेळ ११-६०मधून वजा करणे
११-६०
०५-१०
————
०६-५०
२४ ताशी घड्याळ असेल तर
२३-६० वजा करावे.

Saturday, 4 July 2015

बंडूची इजार

[02/07 7:24 PM] asif: बंडूची इजार
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
१.गाव------
२.काम-----
३.स्वभाव---
४.लवकर---
५.घर------
६.पाणी------
७.कपडे-----
८.कुटुंब------
९.लांब------
१०.कमी------
११.हात------
१२.पाय------
१३.भाऊ-------
१४.कष्ट-------
१५.आश्चर्य------
आ...अवयवावरुन दहा म्हणी लिहा.
[02/07 7:29 PM] asif: २.बंडुची इजार

विरुध्दार्थी शब्द लिहा.
१.गावx
२.शांतx
३.नवेx
४.लांबx
५.कापणेx
६.भाऊx
७.आईx
८.दिवसx
९.संध्याकाळीx
१०.बायकोx
[02/07 7:29 PM] asif: बंडूची इजार
तोंडी काम....
१.बंडू कोणत्या गावात राहत होता?
२.बंडूचा स्वभाव कसा होता?
३.बंडू कोठे काम करायचा?
४.बंडू घरी केंव्हा यायचा?
५.बंडू इजार कोठे शिवला होता?
६.बंडूची इजार किती लांब झाली?
७.बंडू दिसायला कसा होता?
८.बंडूच्या घरी कोण-कोण होते?
९.बंडूच्या बहीणेचे नांव काय होते?
१०.बंडूची आई करत होती?

Saturday, 27 June 2015

अंक ओळख



अंक ओळख 1अंकांची ओळख होण्यासाठी चित्र व अंक यांची सांगड घालून दाखवावी.
·        1ते 10 अंक वस्तूच्या साह्याने मोजायला सांगावे. 
·        ज्या अंकांची ओळख करून देणार आहात त्या अंकाबद्दल तीन ते चार ओळींची गोष्ट सांगावी.
·        सांगितलेल्या अंकएवढे वस्तु मुलांना मोजून दाखवावे.त्या अंकांचे कार्ड मुलांना दाखवावे.
·        सांगितलेल्या अंक मुलांना संख्यातक्त्त्या मध्ये दाखवण्यास व वहीत लिहाण्यास सांगावे.
·        सांगितलेल्या अंकएवढे वस्तु मुलांना वर्गात किंवा इतर ठिकाणी मोज्ञास सांगावे.
·        अंकांची ओळख करून देताना संख्या कार्ड ,संख्यातक्ता व काड्या स्ट्रा,मणी इतर वस्तु.

दहाचा खेळ

दहाचा खेळ : दहा मुलांना गोलात उभे करा. शिक्षकांनी टाळी वाजवल्यावर उजव्या हाताचा पंजा प्रतेक मुलाने वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला करायचं आहे.
आता सगळ्या मुलांना वर केलेले हात मोजून लिहाण्यास सांगावे.खाली केलेले हात सुद्धा मोजून लिहयला सांगावे.
शाब्दिक उदाहरणे :
·         मुलांना हातच्याची शाब्दिक उदाहरणे सोडवायला द्यावी.
·         प्रश्नामध्येकाय माहिती दिली आहे? काय विचारले आहे?उत्तर काढण्यासाठी काय करावे लागेल या तीन प्रश्नावर चर्चा करावी.
·         शाब्दिक उदाहरण,स्ट्रॉ इतर वस्तूंच्या साह्याने प्रत्यक्ष कृतिद्वारे सोडवावे.
·         सोडवलेले उदाहरण कोसटकमध्ये मांडावे व सोडवावे.आलेले उत्तर पूर्ण वाक्यात लिहावे.
·         तोंडी बेरीज तक्त्याच्या मदतीने
·         मुलांना बेरजेची तोंडी उदाहरणे विचारावी.
·         तीन ते चार मुलांचे गुत करावे.प्रतेक गटामध्ये बेरजेचा चार्ट द्यावा. दोन मुलांना तक्त्यामधील उभ्या व आडव्या ओळीतील कोणत्याही एका संख्यावर बोट ठेवण्यास सांगावे व दोघांचेही बोट जेथे मिळेल ती संख्या म्हणजे निवडलेल्या आधीच्या दोन संख्यांची बेरीज असेल.
·         संख्यारेषेच्या मदतीने बेरीज: जमिनीवर संख्यारेषा काढावी.संख्यारेषेच्या मदतीने अंकांची बेरीज मुलांना करून दाखवावी.

Thursday, 28 May 2015

संख्या

वस्तूंचा समूह,दोन समूहातील लहान-मोठेपणा ठरवण्याच्या गरजेतून मोजण्यासाठी विशिस्ट चिन्हांचा उपयोग करण्यात आला आहे. आपल्याकडे पुढील दहा चिन्हे अथवा ध्वनीचा उपयोग करतात त्यास अंक म्हणतात . 1,2,3,4,5,6,7,8,9,0
कितीही मोठा समूह किंवा समुहाचा लहनात लहान भाग या अंकांचा मदतीने दर्शवता येते त्यास संख्या असे म्हणतात.