Saturday 27 June 2015

अंक ओळख



अंक ओळख 1अंकांची ओळख होण्यासाठी चित्र व अंक यांची सांगड घालून दाखवावी.
·        1ते 10 अंक वस्तूच्या साह्याने मोजायला सांगावे. 
·        ज्या अंकांची ओळख करून देणार आहात त्या अंकाबद्दल तीन ते चार ओळींची गोष्ट सांगावी.
·        सांगितलेल्या अंकएवढे वस्तु मुलांना मोजून दाखवावे.त्या अंकांचे कार्ड मुलांना दाखवावे.
·        सांगितलेल्या अंक मुलांना संख्यातक्त्त्या मध्ये दाखवण्यास व वहीत लिहाण्यास सांगावे.
·        सांगितलेल्या अंकएवढे वस्तु मुलांना वर्गात किंवा इतर ठिकाणी मोज्ञास सांगावे.
·        अंकांची ओळख करून देताना संख्या कार्ड ,संख्यातक्ता व काड्या स्ट्रा,मणी इतर वस्तु.

दहाचा खेळ

दहाचा खेळ : दहा मुलांना गोलात उभे करा. शिक्षकांनी टाळी वाजवल्यावर उजव्या हाताचा पंजा प्रतेक मुलाने वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला करायचं आहे.
आता सगळ्या मुलांना वर केलेले हात मोजून लिहाण्यास सांगावे.खाली केलेले हात सुद्धा मोजून लिहयला सांगावे.
शाब्दिक उदाहरणे :
·         मुलांना हातच्याची शाब्दिक उदाहरणे सोडवायला द्यावी.
·         प्रश्नामध्येकाय माहिती दिली आहे? काय विचारले आहे?उत्तर काढण्यासाठी काय करावे लागेल या तीन प्रश्नावर चर्चा करावी.
·         शाब्दिक उदाहरण,स्ट्रॉ इतर वस्तूंच्या साह्याने प्रत्यक्ष कृतिद्वारे सोडवावे.
·         सोडवलेले उदाहरण कोसटकमध्ये मांडावे व सोडवावे.आलेले उत्तर पूर्ण वाक्यात लिहावे.
·         तोंडी बेरीज तक्त्याच्या मदतीने
·         मुलांना बेरजेची तोंडी उदाहरणे विचारावी.
·         तीन ते चार मुलांचे गुत करावे.प्रतेक गटामध्ये बेरजेचा चार्ट द्यावा. दोन मुलांना तक्त्यामधील उभ्या व आडव्या ओळीतील कोणत्याही एका संख्यावर बोट ठेवण्यास सांगावे व दोघांचेही बोट जेथे मिळेल ती संख्या म्हणजे निवडलेल्या आधीच्या दोन संख्यांची बेरीज असेल.
·         संख्यारेषेच्या मदतीने बेरीज: जमिनीवर संख्यारेषा काढावी.संख्यारेषेच्या मदतीने अंकांची बेरीज मुलांना करून दाखवावी.