Thursday 28 May 2015

संख्या

वस्तूंचा समूह,दोन समूहातील लहान-मोठेपणा ठरवण्याच्या गरजेतून मोजण्यासाठी विशिस्ट चिन्हांचा उपयोग करण्यात आला आहे. आपल्याकडे पुढील दहा चिन्हे अथवा ध्वनीचा उपयोग करतात त्यास अंक म्हणतात . 1,2,3,4,5,6,7,8,9,0
कितीही मोठा समूह किंवा समुहाचा लहनात लहान भाग या अंकांचा मदतीने दर्शवता येते त्यास संख्या असे म्हणतात.

Monday 25 May 2015

स्वच्छ

साबणाने आपला चेहरा आणि हात धुवा,
दररोज त्यांना धुवून!
साबण वापरून स्वच्छ ठेवणे
दूर जंतू ठेवण्यासाठी मदत करेल...

kavita

कचरा, कचरा पाहिले जाऊ नका,
च्या छान आणि स्वच्छ आमच्या खेळाच्या मैदानाचीही ठेवू.
आम्ही तो चमक आणि आशा करू
आम्ही एक संघ म्हणून काम केले तर.

आम्ही दररोज चालणे,
आमच्या शाळेत सर्व मार्ग निरोगी आहे.
क्रीडांगण खेळ, नेहमी गमतीदार
आमच्या बागेत प्रत्येकासाठी मोठे आहे.

पाणी प्यायला म्हणून छान आहे
पण विहिर तो खाली वाया घालवू नका.
सर्व प्रकारचे फळे आणि भाजीपाला सवयी,
निरोगी मन विकसित करण्यासाठी मदत करते.

आम्ही ऊर्जा बचत आवडत,
आमच्या वीज कमी करून.
आम्ही एक योजना आहे प्रदूषण मदत करण्यासाठी,
तेव्हा आम्ही करू शकता पुन्हा वापर, पुनर्वापरही.

आम्ही जग एक लोड वाचवू शकले,
आम्ही आमच्या इको कोड रहा तर!...

म्हणी

म्हणी –म्हणी म्हणजे अनुभवाची खाणी.दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे वाक्य म्हणजे म्हण. ही वाक्ये आटोपशीर व बोधप्रद असतात. म्हणीची रचना यमक,अनुप्रासयुक्त असल्यामुळे ती लक्षात ठेवणे सोपे जाते. मोठा आशय अगदी थोडक्यात पण परिणामकारक पद्धतीने सुतरबद्ध अशा वाक्यात प्रकट करणे म्हणजे म्हणीचा वापर करणे.
 

  1. 1.  नाकापेक्षा मोती जड –कमी दर्जाच्या माणसाला अधिक महत्व देणे.शक्तीपेक्षा अवघड कामगिरी स्वीकारणे.
    2.  नाक दाबले की तोंड उघडते –मर्मावर आघात केल्याशिवाय वठणीवर येत नाही.
    3.  नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने-दोषयुक्त काम करणार्‍याच्या मार्गात एकसारख्या अनेक अडचणी येतात.
    4.  बळी तो कान पिळी-ससक्त इतरावरअधिकार गाजवतो.
    5.  कांनामागून आली नि तिखट झाली –श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसे वरचढ ठरणे.
     
    6.  डोळ्यात केर कानात फुंकर-भलत्याच ठिकाणी उपाय करणे.
    7.  आपलेच दात आपलेच ओठ –नात्यातील माणसाविरुद्ध बोलणे अवघड होते.
    8.  ओठात एक पोटात एक –बोलण्यात व कृतीत फरक असणे.
    9.  लहान तोंडी मोठा घास –पात्रता नसताना मोठेपणाच्या गोष्टी बोलणे.
    10. आधी पोटोबा मग विठोबा –आधी स्वार्थ मग परमार्थ.
    11. हातच्या काकणाला आरसा कशाला ?-समोर दिसणार्‍या गोष्टिबदल पुरावा कशाला?
    12. हाताची पाची बोटे सारखी नसतात –सर्व माणसे सारख्या स्वभावाची नसतात.
    13. झाकली मूठ सव्वा लाखाची –दोष उघड न होणे चांगले.
    14. दृष्टी आड सृष्टी –आपल्या अपरोक्ष काय चालले आहे,हे न सांजलेलेच बरे
    15. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे –कर्तुत्ववान माणसाला नेहमी यशप्राप्ती होते.
    16. हसतील त्याचे दात दिसतील –चांगली गोष्ट करताना कोणी हसले तर पर्वा न करणे.
    17. बुडत्याचा पाय खोलात –अवनती होऊ लागली म्हणजे चहूबाजूंनी होऊ लागते.
    18. उचलली जीभ लावली टाळ्याला –दुष्परिणामांचा विचार न करता बोलणे.
    19. उठता लाथ बसता बुक्की –प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन:पुन्हा शिक्षा करणे.
    20. अंगापेक्षा भोंगा मोठा –मूठ गोष्टीपेक्षा तिच्या अनुषंगीत गोष्टीचा बडेजाव मोठा.