Sunday 7 September 2014

एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... 
त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... 
महिने लोटले... वर्षे सरली.... 
पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....
दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा....
शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... 
आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही..
- See more at: http://marathibodhkatha.blogspot.in/2011/03/blog-post_08.html#sthash.epZeDSVU.dpuf

No comments:

Post a Comment